लवकरच लग्नसराईला होणार सुरुवात!
24-11-2023 12:41:19
दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा कार्तिक शुक्ल द्वादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून (ता. २४) तुळशी विवाहांना सुरुवात होत आहे. तुळशी विवाह करण्याची परंपरा असलेल्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्या सोयीने तुळशी विवाह करावा, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
तुळशी विवाह झाल्यानंतर विवाहेच्छुक वधू-वरांच्या लगीनगाईला सुरुवात होते. यंदा १ नोव्हेंबरपासून जूनच्या ३० तारखेपर्यंत विवाहाचे ७४ मुहूर्त आहेत. तसेच काढीव मुहूर्त गृहीत धरल्यानंतर हाच आकडा शंभरीवर जाणार आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीचे मुहूर्त असल्याने विवाह इच्छुकांसाठी सुवर्णयोग आला आहे.
गतवर्षीच्या विवाह मुहूर्तापक्षा यंदा जानेवारी तसेच फेब्रुवारीत अधिक मुहूर्त आहेत. या दोन महिन्यात तब्बल २८ दिवस लग्नमुहूर्त आहेत; तर मे आणि जूनमध्ये प्रत्येकी दोन मुहूर्त आहेत. अशातच सध्या आपल्याकडे काढीव मुहूर्तावर वर्षभर लग्न होतात. असे असले तरी तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे आत्तापासून मंगल कार्यालय, कॅटरर्स, डेकोरेशन बुकिंगसाठी उपवधू- उपवरांच्या नातेवाईकांची लगबग सुरू झाली आहे. सद्यस्थितीत लग्नमुहूर्त जास्त असले, तरी मुहूर्त ठरवताना गुरू बल आदी बाबींचा विचार करूनच तारखा दिल्या जातात. तसेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत लग्न तारखा जास्त असल्याने वधू-वरांकडील मंडळी सोईस्कर तारखा बघत असून तुळशीचे लग्न लागल्याशिवाय शक्यतो तारखा निवडल्या जात नाहीत. याखेरीज काही विवाहेच्छुकांचा काढीव लग्न मुहूर्तावरही भर असतो. त्यामुळे आणखी दिवस विवाह सोहळे रंगणार आहेत.
🔸विवाह मुहूर्त :
⭕नोव्हेंबर १, ६, १६, १८, २०, २२, २५, २७, २८, २९
⭕डिसेंबर ६, ७, ८, १४, १५, १७, २०, २१, २२, २५, २६, ३१.
⭕जानेवारी २०२४ :
२, ३, ४, ५, ६, ८, १३, १७, १८, २२, २७, २८, ३०, ३१.
⭕फेब्रुवारी १, २, ४, ६, १२, १३, १४, १७, १८, २४, २६, २७, २८, २९.
⭕मार्च ३, ४, ६, ७, ११, १६, १७, २६, २७, ३०
⭕एप्रिल १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
⭕मे १,२
⭕जून २९ आणि ३० असे विवाह मुहूर्त आहेत.
🔶 उज्ज्वल शुभविवाह संशोधन, पुणे
नोंदणीसाठी संपर्क : 7972204058, 7028495285